सापुतारा, पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा, समृद्धी महामार्गालगत टेंट सिटी उभारावी..
पोलीस वार्ता, नाशिक : नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कुंभमेळ्यासाठी आवश्यक विकास कामांना गती देण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर आज दि.19 नोव्हेंबर रोजी प्राधिकरणाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या टेन्ट सिटी उभारणी उपाययोजना याविषयावर दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक संपन्न झाली.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या टेन्ट सिटीच्या सर्वांगीण तयारीचा आढावा पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी घेतला. तसेच दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध होतील याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर हा जोतिर्लिंग अध्यात्मिक सर्किट तयार करून हेलिकॉप्टर सेवेने जोडण्यासाठी प्रयत्न करावेत, टेन्ट सिटीच्या ठिकाणी प्रदर्शन केंद्र तयार करावे. त्याचा प्रस्ताव सादर करावा. कुंभमेळ्यासाठी वेगवेगळ्या भागातून भाविक येतील. त्यांच्यासाठी सापुतारा, पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा, समृद्धी महामार्गालगत टेंट सिटी प्रस्तावित करावी. यामुळे नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकतील. असे निर्देश खंदारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
नाशिकमधील कलाकुंभमध्ये स्थानिक कारागीर, स्वयं-साहाय्य गट आणि हस्तकला व्यावसायिकांसाठी दुकाने उपलब्ध करून देता येतील. त्यात राज्य मंडप, कुंभ संग्रहालय, नदी मंडप, एक जिल्हा एक उत्पादनाची दुकाने, खुले थिएटर, कला प्रदर्शन, अमृत स्नान मिरवणुका, आखाडा मिरवणुकांचा लाभ भाविकांना घेता येईल. याबरोबरच यज्ञ, पूजापाठ, अध्यात्मिक प्रवचनांचा लाभ भाविक घेऊ शकतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. टेन्ट सिटीसाठी त्र्यंबक रोडवरील खादी ग्रामोद्योगाची जमीन निश्चित करण्यात आली आहे. तसेच टेन्ट सिटीसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी माहिती दिली.
यावेळी प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी (छत्रपती संभाजीनगर), जितेंद्र डुडी (पुणे), डॉ.इंदुराणी जाखड (पालघर), अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील (नाशिक) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी बैठकीत सहभागी होऊन उपस्थित होते.
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल
भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...