भुसावळ – शहरातील वरणगांव रोडवरील साकरी फाटा, गोलानी कॉम्प्लेक्स जवळ पिडीत मुलीचे आई- वडील मोल मजुरी करण्यासाठी गेले होते.घरी परतले असता मुलगी घरामध्ये मिळून न आल्याने आजू बाजूला शोध घेतला. कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केल्याचा बाजारपेठ पोलीस स्टेशनला ता.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल आहे.संशयितास मंगळवार (ता.७ ) रोजी पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली.पिंटू नावले असे संशयितांचे नाव आहे.
पिडीत अल्पवयीन चौदा वर्षीय मुलीचे आई वडील वरणगांव रोडवरील,साकरी फाटा, गोलानी कॉम्प्लेक्स जवळ ता.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी सहा वाजेला मोल मजुरी करून सायंकाळी सहा वाजेला घरी परतले. घरामध्ये मुलगी मिळून न आल्याने आजू बाजूला शोध घेतला व अज्ञात इसमांविरुद्ध अपहरण केल्याप्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता.सदरील प्रकरणांचा पोलिसांचा शोध सुरू असतांना पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना बातमीदारा कडून बातमी मिळाली की,अपहरण गुन्ह्यातील संशयित हा पीडित मुलीसोबत बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) येथे वास्तवाला आहे. तात्काळ पथकास मध्यप्रदेशात पाचारण करून मिळालेल्या माहितीची खात्री करून कारवाईचे आदेश दिले.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयितास अल्पवयीन पीडित मुलीसह (मध्यप्रदेश) बऱ्हाणपूर येथून ता.७ रोजी अटक केली..मुलीच्या जबाबावरून संशयित पिंटू नावले यांच्याविरुद्ध कलमात वाढ करण्यात आलेली असून पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























