भुसावळ – शहरातील ईराणी वस्ती असलेल्या पापानगर भागात एल.सी.बी.व बाजारपेठ ठाण्याची संयुक्त कारवाई करीत अचानक कोंबींग ऑपरेशन राबविले असता कोबोंग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील गुन्ह्यातील फरारी आरोपींना ता.३० रोजी ताब्यात घेण्यात आले
दि.३०/०९/२०२५ रोजी मा. पोलीस अधीक्षक, सो.जळगांव, श्री डॉ महेश्वर रेड्डी यांनी सणउत्सव काळात जिल्हयात घडणारे मालमत्तेविरुध्दचे गंभीर गुन्हयांचे अनुषंगाने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या ईराणी वस्ती पापा नगर येथे कोंबींग ऑपरेशन राबवून कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते.

त्यानुसार मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव व पोलीस निरीक्षक, श्री राहुल वाघ, भुसावळ बाजारपेठ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव व भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. येथील अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तीक रित्या ईराणी वस्ती असलेल्या पापानगर, भुसावळ येथे अचानक कोंबींग ऑपरेशन राबविले असता कोबोंग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील आरोपी नामे तालीय अली रशीद अली वय २० वर्ष रा. रझा टॉवर, पापा नगर, भुसावळ, मोहम्मद अली लियाकत अली वय ३५ रा. रझा टॉवर, पापा नगर, भुसावळ हे घरी हजर मिळून आल्याने त्यांची सखोली चौकशी केली असता आरोपी नामे तालीब अली रशीद अली वय २० वर्ष रा. रझा टॉवर, पापा नगर, भुसावळ, हा एमआयडीसी पो.स्टे. येथे गुरनं. १५१/२०२५ भा.न्या.संहिता क.३०३ प्रमाणे तसेच वरणगांव पो.स्टे. येथे गुरनं. ६२/२०२५ भा.न्या. संहिता कलम ३०३ प्रमाणे दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्हयांमध्ये फरार असुन त्यास गुन्हयाचे पुढील तपासकामी एमआयडीसी पो.स्टे.यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपी नामे मोहम्मद अली लियाकत अली वय ३५ रा. रझा टॉवर, पापा नगर, भुसावळ हा वारला पो.स्टे. जिल्हा बडवाणी (मध्यप्रदेश) येथील गुरनं. ३५३/२०२४ भा. न्या. संहिता कलम ३१८ प्रमाणे दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्हयात फरार असुन त्यास गुन्हयाचे पुढील तपासकामी वारला पो.स्टे. यांचे ताब्यात देण्यात आले असून त्याचेवर खालील प्रमाणे हात चलाकी करुन फसवणूक करणे तसेच जबरी चोरीचे मालमत्तेविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपी हे मालमत्तेविरुध गुन्हे करण्याचे सवयीचे असून ते गुन्हा केल्यानंतर बऱ्याच दिवसांपासून फरार होते त्यांचा शोध घेवूनही ते पोलीसांना मिळून येत नव्हते.आज रोजी त्यांना ताब्यात घेवून संबंधीत पो.स्टे.यांचे ताब्यात देण्यात आले आहेत.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक सो, जळगांव, डॉ महेश्वर रेड्डी, मा.अपर पोलीस अधीक्षक, श्री अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव, पोलीस निरीक्षक, राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि नितीन पाटील, भुसावळ बाजारपेठ, पोउपनि, सोपान गोरे, स्थागुशा जळगांव, पोउपनि राजु सांगळे भुसावळ बाजारपेठ, मपोउपनि, भारती काळे, भुसावळ बाजारपेठ, श्रेणी पोउपनि, रवी नरवाडे, स्थागुशा जळगांव तसेच स्थानिक गुन्हे शाखा,जळगांव व भुसावळ बाजापेठ येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.


























