Homeताज्या बातम्यादुचाकीसह चार चाकी वाहनांवर "प्रेस" लिहलेल्या बोगस पत्रकारांची चौकशी करण्याची मागणी

दुचाकीसह चार चाकी वाहनांवर “प्रेस” लिहलेल्या बोगस पत्रकारांची चौकशी करण्याची मागणी

जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेचे शहर वाहतूक शाखेला निवेदनातून साकडे

नंदुरबार : जिल्ह्यात काही असामाजिक घटकांनी पत्रकारितेचे नाव घेऊन गैरप्रकार करण्याचे प्रकरण निदर्शनात आले आहे. शहरासह जिल्ह्यात काही व्यक्ती आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर ‘प्रेस’ असे नाव लिहून बेकायदेशीरपणे फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे खऱ्या पत्रकारांच्या प्रतिमेस धक्का बसत असून, काही गुन्ह्यांमध्ये अशा बोगस प्रेस वाहनांचा वापर झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. याबाबत नंदुरबार शहर वाहतूक शाखेला दिनांक २८ रोजी निवेदन देण्यात आले आहे.

या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधत नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेने शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्याकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अशा बोगस पत्रकारांना ओळखून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारचे प्रकरण घडू नये यासाठी वाहनांवर ‘प्रेस’ असे लिहिण्यावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे.

शहर वाहतूक शाखेने या प्रकरणाची दखल घेत, सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी शाखेने शहरातील सर्व रस्ते आणि चौकाचौकांवर विशेष पथक तैनात करून अशा वाहनांची शोध मोहीम हाती घेतली आहे. तसेच, नागरिकांनाही अशा प्रकारच्या संशयास्पद वाहनांबद्दल पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांना निवेदन देतेवेळी जिल्हा पत्रकार संघटनेचे समन्वयक विशाल माळी, साप्ता. वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष प्रविण चव्हाण, उपाध्यक्ष सुभाष राजपूत, कार्याध्यक्ष महेंद्र चौधरी, सचिव सुबोध अहिरे, सहसचिव अजिम आशमी, सदस्य दिलीप बडगुजर, विष्णू पाटील, आफिक मिर्झा, मनोज समशेर तसेच किशोर गवळी, प्रदीप गरुड, जितेंद्र जाधव, जगदिश ठाकूर, पंकज सिंधी, मिलिंद भालेराव, मोईन शाह आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

error: Content is protected !!