दिल्ली – ( दीपक पवार) मित्रवर्य अश्विन राजपुत हा एक पत्रकारच नाही….. तर तो एक संवेदनशील, दूरदृष्टी असलेला, भावनिक, अभ्यासु आणि जिज्ञासू व्यक्तिमत्त्वाचा धनी आहे. त्याच्या कॅमेऱ्यातुन तर तो कल्पनेपलीकडचे छायाचित्र रेखाटतो. पण माणसाच्या अंतर्मनाचा आशय सुद्धा त्याच्या कॅमेऱ्यात कैद होतो. हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
अन्यायाविरुद्ध चिडून उठणारा, स्पष्टवक्ता, आपल्या प्रांजळ मनात काहीही शिल्लक न ठेवता रोखठोक बोलणारा….. “स्पष्टवक्ता सुखी भव!”आपली फोटोग्राफी आणि पत्रकारिता यांचे सोबत इमान जपणारा….. आणि मैत्रीच्या पलीकडचा एक भावार्थ माणुस म्हणजे अश्विन राजपूत. अशा ह्या विशेष चित्रकार आणि पत्रकाराला त्याच्या जन्मदिवसानिमित्त मानाचा मुजरा….!




































