प्रतिनिधी सातारा मीनाक्षी पोल
सातारा जिल्हातील कराड तालुका मध्ये उंब्रज बाजार पेठ परिसरात आज महाराष्ट्र सैनिक प्रमोद ताईबाई प्रकाश आरणे
राहणार – कोपरगाव (शिर्डी) जि.अहिल्यानगर हे पक्षध्वज पायी संकल्प यात्रा कोल्हापूर ते (महालक्ष्मी मंदिर ते दादार छत्रपती शिवाजी पार्क,मुंबई शिवतीर्थ ) पर्यत पायी चालत निघाले आहेत ते महालक्ष्मी देवीला साकडे घालून पक्षाला आगामी काळातील महानगरपालिका,नगर परिषद,नगर पंचायत, जिल्हा परिषद,पंचायत समिती,स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व निवडणुकांमधे पक्षाला भरभरून यश मिळावे व साहेबांना दीर्घआयुष्य लाभो, व पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी व जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवाव अशी ईच्छा साहेबांची पुर्ण व्हावी,असे देवीला साकडे प्रार्थना करीत कोल्हापूर वरून निघाले होते तेव्हा त्याचे उंब्रज नगरीत स्वागत करून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प हार घालून त्याच्या कार्याला शुभेच्छा दिल्या व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात अमोल सुभाष कांबळे सातारा जिल्हा सचिव रणजीत कदम तालुका अध्यक्ष विजय वाणी शहर अध्यक्ष बापू कदम उप शहर अध्यक्ष रमेश पाटील , सुनील जाधव व प्रमुख जन उपस्थित होते




































