Homeउद्योगमोहदा येथे खानावळ व सलून दुकानाला भीषण आग; आगीत सर्व साहित्य जळून...

मोहदा येथे खानावळ व सलून दुकानाला भीषण आग; आगीत सर्व साहित्य जळून राख!

खानावळला मंगळवारी अचानक पहाटे आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने बाजूला असलेल्या सलून दुकानालाही आग लागली..

पोलीस वार्ता, वणी : तालुक्यातील मोहदा येथे मंगळवारी दि.6 मे ला पहाटे 4 वाजताच्या सुमारास एका खानावळला अचानक आग लागली आगीत खानावळ संपूर्ण जळून खाक झाली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहान झाली नसल्याची माहिती मोहदाचे उपसरपंच सचिन रासेकर यांनी दिली आहे.

सविस्तर वृत्त असे की, वणी, मोहदा बस स्टँड जवळील सुनीता रमेश काळे यांच्या मालकीचे खानावळ आहे. या खानावळला मंगळवारी अचानक पहाटे आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने आग पसरत बाजूला असलेल्या सलून दुकानालाही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच मोहदा उपसरपंच सचिन रासेकर यांनी बातमीची खात्री करून वणीचे आमदार श्री.संजय देरकर यांना संपूर्ण माहिती दिली. आमदार देरकर यांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ अग्निशमन विभागाला बातमी पोहचवली. आणि अग्निशमन दल लवकरच घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला एक ते दीड तासाची कसरत करावी लागली यात त्यांना स्थानिक नागरिकांची देखील मदत मिळाली. सकाळी सहा वाजता आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. आगीचं कारण स्पष्ट झाले नसून या घटनेत खानावळ मालक सुनीता रमेश काळे व सलून व्यावसायिक ओमप्रकाश विनोद नक्षीने या दोघांचे मोठं आर्थिक नुकसान झाले आहे.

खानावळ मालक सुनीता काळे या महिला विधवा असून खानावळ चालवून परिवाराचा उदरनिर्वाह करत होत्या, आगीमुळे झालेल्या नुकसानीत काही रोख रक्कम, फ्रिज, कुलर, पाण्याचे ड्रम, भाडे असे खानावळ मधील इतर साहित्य जळून खाक झाले आहे. तर सलून चालक ओमप्रकाश नक्षीने यांच्या सलून दुकानातील खुर्च्या, फर्निचर आणि बाकीचे सामान देखील जळून राख झाली आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ओव्हरलोड राख भरण्यावरून वाद ; धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....

भुसावळात भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

0
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

भुसावळात ‘अमृत’ योजनेचा घोटाळा? नगराध्यक्षांचा संताप उसळला ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

0
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

error: Content is protected !!