भुसावळ – रेल्वे स्टेशनकडे जाणारे डाऊन रेल्वे ट्रकवर दिनांक २८/११/२०२४ रोजी ३:०० वाजेच्या सुमारास अनोळखी इसमांचा मृतदेह आढळून आला आहे.
याबाबत सरस्वती नगर भागातील रेल्वे कर्मचारी शुभमकुमार शंभुप्रसाद वय.२५ वर्षे यांनी दिलेल्या खबरीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर ६८/२०२४ सी.आर.पी.सी.१९४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.अंगाने सडपातळ, अंगात पिवळया रंगाचे शर्ट फुल बाहीचा त्यावर काळे टिपके असलेला व आकाशी रंगाची जिन्स पॅण्ड, उजव्या हाताचे मनगटावर जयसेतु, मंदिराचे चिन्ह, संदिप, मॉ असे गोंदलेले तसेच “लवचे” चिन्हामध्ये इंग्रजित S व A असे गोंदलेले,हातामध्ये लाल रंगाचा दोरा बांधलेला असा पोशाख परिधान केलेला आहे. एक अनोळखी पुरूष इसम वय ३० ते ३५ वर्षे अंदाजे यास मालगाडी रेल्वेने धडक दिल्याने तो जागेवरच मरण पावला असुन मालगाडी निघुन गेले नंतर त्यास जवळून बघितले असता तो इसम धडापासुन कापला जावून धड व पाय वेगळे झाले असुन काहीएक हालचाल करीत नसुन मयत झालेला आहे.या बाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली असून ओळख पटल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आव्हाहन करण्यात आलेले आहे.


























