Homeउद्योगबिटको ते नांदूरनाका रस्त्याचे डांबरीकरण करून, वाहतुकीस सुरळीत करावा अन्यथा मनसेचा आंदोलनाचा...

बिटको ते नांदूरनाका रस्त्याचे डांबरीकरण करून, वाहतुकीस सुरळीत करावा अन्यथा मनसेचा आंदोलनाचा इशारा!

खोदलेल्या रस्त्यांमुळे वाहतुक कोंडीच्या समस्या तसेच या खड्ड्यांमध्ये पडून होणारे अपघात याकडे नाशिक महानगरपालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष..

पोलीस वार्ता, नाशिक : आगामी 2027 नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरभर विकास कामांच्या नावाखाली सर्वच प्रमुख रस्ते खोदून ठेवलेल्या अवस्थेत नाशिककर बघत आहे आणि यामुळे होणाऱ्या वाहतुकीच्या आणि धुळीच्या समस्यांना नाशिककर सामोरे जात आहे. याबद्दल तक्रार करणार तरी कोणाला? असा प्रश्न लोकांसमोर उभा आहे. या खोदलेल्या रस्त्यांमुळे शहरात वाहतुक कोंडीच्या समस्या वाढल्या आहेत. तसेच या खड्ड्यांमध्ये पडून होणारे लहान मोठे अपघात याकडे नाशिक महानगरपालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष करून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सध्या नाशिक शहरात चालू केला जात आहे.
नाशिकरोड परिसरातील बिटको ते जेलरोड मार्गे नांदूरनाका या रस्त्याचे गेल्या दोन-तीन वर्षापासून सतत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे मोठ्या प्रमाणावर खोदकाम केले जात आहे. नाशिकरोड महानगरपालिका अधिकारी आणि ठेकेदार यांचे ऋणानुबंध तयार झाले असून ते सतत खोदकाम करण्याच्या परवानग्या देतात आणि नागरिकांच्या जीवाशी खेळतात.

बिटको ते नांदूरनाका या रस्त्यावरून जड वाहनांची वाहतूक होऊ नये यासाठी नेहमीच आंदोलने व निवेदने वाहतूक पोलिसांना देण्यात येतात. ज्याचे कारण म्हणजे या रस्त्यावर झालेले अपघात आणि झालेली जीवित हानी. जेलरोड मार्गावर नोट प्रेस, शाळा, कॉलेज, भाजीमार्केट या सर्वांमुळे कामगार व विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते आणि महापालिकेने खोदलेल्या खड्ड्यांमुळे आणि निकृष्ट दर्जाच्या झालेल्या रस्त्यामुळे पुन्हा एकदा अपघातात काही लोकांचा जाण्याची भीती व्यक्त होत आहे. या रस्त्यावरून गाडी चालवणे कठीण झाले असून वाहतुक कोंडीचे प्रमाण देखील खूप वाढले आहे. बऱ्याच लोकांना मणक्याच्या समस्या, धुळीमुळे श्वासनाच्या समस्या उद्भवल्याचे लोकांकडून कळले आहे.

नाशिकरोड विभागीय महानगरपालिकेने लवकरात लवकर संपूर्ण रस्ता नवीन डांबरीकरण व लोकांना वाहतुकीस सुरळीत करून द्यावे. अशी मागणी सर्व नाशिकरोड व जेलरोडच्या नागरिकांची असून या प्रश्नासंबंधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला असून विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष नितीन धानापुणे यांनी नाशिकरोड विभागीय महानगरपालिकेला निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...

error: Content is protected !!