मुलभूत अधिकार व मानवाधिकार यांचा तुलानात्मक आढावा घेऊन मानवाधिकाराच्या इतिहासाची तसेच करागृहातील न्यायाधीन बंदींच्या जामिनाबाबत मागदर्शन..
पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यामाने नाशिक येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आज दि.10 डिसेंबर रोजी ‘आंतराष्ट्रीय मानवी हक्क दिवस’ साजरा करण्यात आला. याबाबत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या अधिक्षक अरूणा मुगूटराव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
दिवाणी न्यायाधिश (वरीष्ठ स्तर) तथा नाशिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुहास भोसले यांनी कार्यक्रमात बोलतांना भारतीय राज्यघटनेतील नमूद मुलभूत अधिकार व मानवाधिकार यांचा तुलानात्मक आढावा घेऊन मानवाधिकाराच्या इतिहासाची तसेच करागृहातील न्यायाधीन बंदींच्या जामिनाबाबत मागदर्शन केले. शेवटी श्रीमती मुगुटराव यांनी दि. 10 डिसेंबर हा मानवी हक्कांचा उद्घोष करणारा दिवस असल्याचे सांगत सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे आयोजन अपर पोलीस महासंचालक सुहास वारके कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य आणि विशेष कारागृह महानिरिक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आले होत. या कार्यक्रमास दिवाणी न्यायाधिश (वरीष्ठ स्तर) तथा नाशिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुहास भोसले, पोलीस उपअधीक्षक श्रीमती निकम, कारागृहाचे अतिरिक्त अधीक्षक सचिन चिकणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सहाय्यक अधीक्षक प्रवीण पोहरे, प्राधिकरणाचे सहाय्यक अभियोक्ता दुर्गेश पोखळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
परभणी : शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे क्रांतिसूर्य जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, जगदगुरू एकोरामाराध्य आणि भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील उघडा महादेव मंदिर,...
शाहपुर | दिनांक 20 अप्रैल 2026
नगर परिषद शाहपुर की अध्यक्ष श्रीमती साधना वीरेंद्र तिवारी द्वारा जनगणना 2027 के अंतर्गत स्व-जनगणना (Self Enumeration) प्रक्रिया को...