मंत्री गिरीश महाजन यांनी दि 3 नोव्हेंबर रोजी त्रंबकरोड येथील उपोषणकर्त्या व परिसरातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने चर्चा केली..
पोलीस वार्ता, नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात नियोजन व्यवस्था करण्यासाठी तसेच प्रयागराज येथील कुंभमेळ्याचा अनुभव व सर्व शक्यता लक्षात घेता विविध विकास कामे चालू केली आहे. नाशिक त्रंबकेश्वर रस्त्याचे रुंदीकरण होत असताना जागा हस्तांतरित करून काम चालू आहे तसेच त्र्यंबकेश्वर मधील अतिक्रमे काढण्याची देखील कामे सुरू आहेत. परंतु यात स्थानिक रहिवाशांचा विरोध होत असून स्थानिक लोक उपोषणाला देखील बसले होते.
मंत्री गिरीश महाजन यांनी दि 3 नोव्हेंबर रोजी त्रंबकरोड येथील उपोषणकर्त्या व परिसरातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने चर्चा केली. त्यांनी उपोषणकर्त्यांची समजूत काढून उपोषण स्थगित करण्याची विनंती केली.
रस्त्याचे कामेही तितकीच महत्त्वाची असल्याने कोणावरही अन्याय होणार नाही. आवश्यकतेनुसार जमीन अधिग्रहित केली जाईल. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये कुंभमेळा प्राधिकरणाच्या सदस्यांबरोबर प्रत्यक्ष पाहणी करून याबाबत निर्णय घेण्यात येईल असे राज्याचे जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले. त्यानुसार उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्यांच्या विकास कामादरम्यान कोणाचेही नुकसान होणार नाही या पद्धतीने कामे करावी असे निर्देश दिले असून त्यामुळेच मी उपोषणकर्त्यांशी चर्चा करायला आलो आहे. शासनाच्या वतीने आवश्यकतेनुसार नुकसान भरपाई व नियमानुसार योग्य मोबदला दिला जाईल असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत देवळालीच्या आमदार सरोज आहिरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे जलद शर्मा यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, त्र्यंबकेश्वर नगरपरिषद येथील अधिकारी उपस्थित होते.
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल
भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल
भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...