नाशिक शहरातील खैरेमळा, लक्ष्मीनगर येथे काही बंगलादेशी महिला आपली ओळख लपवून अवैध कागदपत्रांसह राहत होत्या..
पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरातील चोरी, घरफोड्या तसेच गुन्ह्यातील फरार चोर आणि सराईत गुन्हेगारांचा तपास करून कारवाई करण्याचे तसेच ओळख लपवून अवैद्यरित्या वास्तव्य करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री.संदिप कर्णिक साहेब यांनी शहर पोलीस गुन्हेशाखा व संबंधित पोलीस ठाण्याना दिले आहेत.
त्यानुसार तपास करत असताना अंबड पोलीस ठाण्याचे सपोनि प्रताप गिरी यांना गुप्त माहिती मिळाली की, नाशिक शहरातील खैरेमळा, लक्ष्मीनगर येथे काही बंगलादेशी महिला आपली ओळख लपवून अवैध कागदपत्रांसह राहत आहे. सदरची माहिती नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-1 चे वपोनि मधुकर कड यांना देवून त्यांच्या मार्गदर्शनात दोन पथके तयार करण्यात आली त्यात अंबड पोलीस ठाणे कडील सपोनि प्रताप गिरी, मपोउपनि सविता उंडे, पोअं पवार व गुन्हे शाखेचे पोउपनि चेतन श्रींवंत, सुदाम सांगळे यांनी दि.20 जुलै 2025 रोजी खैरेमळा लक्ष्मीनगर, साईनगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक या ठिकाणी छापा टाकून चार बांग्लादेशी महिला ह्या कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले.
भारत-बांग्लादेश सिमेवरील मुलकी अधिकाऱ्यांचे लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून ह्या महिला नाशिकमध्ये राहत होत्या. त्यांच्याकडे भारतीय नागरीकत्वाची खोटी व बनावट आधारकार्ड सारखी कागदपत्रे मिळुन आली. अधिक विचारपुस करता त्यांनी सांगितले की, ही कागदपत्रे त्यांना इसम नवजीत भवन दास (वय-38) रा. खैरेमळा, लक्ष्मीनगर, साईनगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक आणि इसम जगदीश मिस्तरी, रा. आराजंग, सुरत व बांग्लादेश येथील दोन इसम यांनी वेगवेगळया राज्यामधून बनवुन दिले आहे. बांगलादेशी महिलांची नावे 1) माईशा हाबिब शेख, (वय-22) मुळ रा. बोरीशन, नागोर, पिरोपुर, बांगलादेश, 2) निशान मिहिर शेख (वय-21) रा. अलिपुर, परितपुर, थाना कोतवाली, जिल्हा परितपुर, बांगलादेश, 3) झुमूर हसन शेख, (वय-33) रा. शिदीपाशा थाना, अभयनागोर, जिल्हा जोशीर, बांग्लादेश, 4) रिहाना जलील गाझी, (वय-30) रा. थाना मरूडगंडा, जिल्हा बागीरहट, गाव चंडीपूर, राज्य खुलणा, बांग्लादेश अशी असल्याची त्यांनी सांगितली. या महिलांना खोटी कागदपत्रे बनवून देणाऱ्यांविरूध्द पोउनि सुदाम सांगळे यांनी पंचवटी पोलीस ठाणे येथे सरकारतर्फे फिर्याद दिल्याने गुरनं 360/2025 भा.न्या.सं. कलम 336(2)(3), 340(2), 3(5) सह गुन्हा दाखल करून पारपत्र (भारतात प्रवेश) नियम 1950 कलम 3 सह 6, परकीय नागरीक आदेश 1948 परिच्छेद 3(1), परकीय नागरीक कायदा 1946 चे कलम 14 अन्वये फिर्याद दिली आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) किरकुमार चव्हाण, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके, गुन्हेशाखा युनिट-1 चे वपोनि. मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 कडून मिळून करण्यात आली. पथकात श्रेणी पोउनि किरण शिरसाठ, पोह प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, योगीराज गायकवाड, उत्तम पवार, महेश साळुंके, नाझीमखान पठाण, रोहिदास लिलके, मिलींदसिंग परदेशी, विशाल देवरे, सुकाम पवार, पोअं समाधान पवार, गोरक्ष साबळे, राहुल पालखेडे, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, आप्पा पानवळ, मपोह शर्मिला कोकणी, मपोअं मनिषा सरोदे, अनुजा येलवे यांचा देखील समावेश होता.
✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल
भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल
भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...