योजनेच्या लाभासाठी पात्र व्यक्तींनी आपले सरकार या संकेतस्थळावर जाऊन 1 ते 31 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत..

पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत संपूर्णपणे कला-साहित्य या क्षेत्राशी निगडित असलेल्या आणि यातून त्यांची उपजिविका अवलंबून आहे, अशा मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार यांना राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजनेंतर्गत प्रती महिना रूपये 5 हजार मानधन देण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी पात्र व्यक्तींनी आपले सरकार या संकेतस्थळावर जाऊन.. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या पोर्टवर 1 ते 31 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय समिती सदस्य सचिव तथा जिल्हा परिषदेच्या उप-मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ यांनी दि.25 जून 2025 रोजी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
-
योजनेच्या लाभासाठी पात्रता..
1. साहित्यिक किंवा कलावंत हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. लाभार्थ्याचे वय 50 पेक्षा जास्त आहे.
2. दिव्यांगांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे अशी आहे.
3. कला व साहित्य क्षेत्रात किमान 15 वर्षे योगदान हवे.
4. साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातलेल्या व्यक्ती, वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा, परितक्त्या, दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य आहे.
5. कलाकाराचे सर्व मार्गानी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रूपये 60 हजार पेक्षा जास्त नसावे.
6. ज्या कलाकरांची उपजिविका केवळ कलेवरच अवलंबून आहे तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते, मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही, असे कलाकार, केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे व इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले कलाकार या योजनेसाठी पात्र आहेत.

-
आवश्यक कागदपत्रे..





































