कुंभमेळ्यात अनेक लोक चेंगरुण मेले. या सरकारला हिंदूंचे काहीच देणघेण नाही. दिल्ली रेल्वे स्टेशन चेंगराचेंगरी घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे,
पोलीस वार्ता, ठाणे : नवी दिल्ली स्टेशनवर झालेल्या गोंधळ आणि त्यातून झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला. यावेळी सरकारकडून प्रयागराज कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या गर्दी प्रमाणे नियोजन नसून ही सरकारची लापरवाही आहे. यात रेल्वेमंत्री आणि भाजप केंद्र सरकारवर विरोधी पक्ष व सर्व स्तरातून टीका होत आहे. या आधी देखील काही दिवसांनी पहिले प्रयागराज येथे पौर्णिमेच्या वेळेस स्नानासाठी झालेल्या चिंगराचेंगरी देखील 18-20 लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांचा नेमका आकडा समोर आला नाही. आता देखील नवी दिल्ली स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेत नेमके किती लोक मरण पावले याचे स्पष्ट आकडे भाजप सरकार लपवत असल्यास आरोप होत आहे.
त्यातच वंचित बहुजन आघाडीची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. ती पुढील प्रमाणे…

रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा!
हे सरकार झोपलेले आहे, यांना कोणाचेही देणघेण नाही. कुंभमेळ्यात जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते, त्या प्रमाणे त्यांची व्यवस्था करायला पाहिजे होती. या कुंभमेळ्यात अनेक लोक चेंगरुण मेले. या सरकारला हिंदूंचे काहीच देणघेण नाही. दिल्ली रेल्वे स्टेशन चेंगराचेंगरी घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असे वक्तव्य वचितचे प्रवक्ते ॲड.अरुण जाधव यांनी केले आहे ते राज्य प्रवक्ते आहेत वंचित बहुजन आघाडीचे.







































