Homeआरोग्यलाडकी बहीणीची रस्त्यावरचं भयावह प्रसुती, साड्या आडव्या लावून भगिनींनीच दिला बाळाला निवारा..

लाडकी बहीणीची रस्त्यावरचं भयावह प्रसुती, साड्या आडव्या लावून भगिनींनीच दिला बाळाला निवारा..

तब्बल अडीच तास गर्भवती बाई व बाळ रस्त्यावर होते पण फोन करून सुद्धा, ना डॉक्टर आले, ना नर्स? किती निर्दयी? उपचार केंद्राच्या अवघ्या एक किमीवर ही घटना घडते..

पोलीस वार्ता, चोपडा : चार मंत्री असलेल्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमळी येथून एक गर्भवती महिलेची घटना समोर आली गावातल्या बायकांनी रस्त्यावर केली डिलीवरी आणि दगडाने नाळ तोडली, काय आपली व्यवस्था? आजच्या युगात रुग्णालयाच्या सोई सुविधा उपलब्ध असलेल्या काळात एका गर्भवती महिलेचं रस्त्यावर बाळंतपण करावं लागलं आहे ही घटना महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी काळीमा फासणारी आहे.
महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्याने पतीने दुचाकीवर रुग्णालयात नेण्यासाठी आणले तेव्हा वैजापूर गावाजवळ प्राथमिक आरोग्य केंद्र एक किमी दूर असताना रस्त्यावरच गर्भवती महिलेचं बाळंतपण करावं लागलं तब्बल अडीच तास ती बाई व बाळ रस्त्यावर होते पण फोन करून सुद्धा, ना डॉक्टर आले, ना नर्स? किती निर्दयी? उपचार केंद्राच्या अवघ्या एक किमीवर ही घटना घडते तरी आणि रस्ते व्यवस्थित असलेल्या गावात ही दुर्दैवी घटना घडती आहे.
सरकार फक्त राज्याच्या प्रगतीच्या जाहिराती करण्यात व्यस्त आहे पण मुळात राज्याच्या सर्व भागात रुग्णालय व्यवस्था आणि उपचार सुविधा पोहचल्या आहे का? याचा काही तपास करत नाहीत. एकीकडे स्त्रियांना लाडक्या बहिणी मानून 1500 रूपये महिन्यांना दिले म्हणजे राज्य सरकारची जबाबदारी संपली का? राज्यातील आरोग्य सुविधा देणारी यंत्रणा नेमकी काय करतेय? कुठे गेल्या सरकारची रूग्णवाहिका? कुठे गेली प्राथमिक आरोग्य उपचार केंद्र? या झोपलेल्या आणि आळशी सरकारी यंत्रनेने अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.
आजही राज्याच्या बऱ्याच भागात आरोग्य विभाग असून नसल्यासारखे आहे त्यात अतिदुर्गम व आदिवासी भागात आदिवासींच्या मुलभूत सोयी सुविधांकडे तर जातीने दूर्लक्ष होण्याची बाब वारंवार उघड होत असते. मात्र प्रशासनावर बसलेले लोकसेवक सोयिस्करपणे याकडे कानाडोळा करीत असतात. हे कुठपर्यंत चालेल? आणि याकडे कोण लक्ष देईल? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.‌ फोन करूनही अॅम्ब्यूल्सन वेळेवर येत नाही मग अशा सुविधेचा फायदा काय? असा प्रश्न घडलेल्या घटनेवेळी जमलेल्या आदिवासी माता बहिणींनी पडला आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी चोपडा तालुक्यातील बोरमळी खैऱ्यापाणी (पाडा) या आदिवासी दुर्गम भागात जाऊन प्रसूती झालेल्या मातेस भेट देऊन आदिवासी बांधवांशी संवाद साधला.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी : विनायक पाटील, भुसावळ
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!