Homeउद्योगदोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण थेट चाळीसगाव...

दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण थेट चाळीसगाव पोलीस ठाण्यात!

पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाणे सोडणार नाही.. -आमदार मंगेश चव्हाण

पोलीस वार्ता, जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात पोलीसांचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाळीसगाव पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी दि.18 मे रोजी सायं 6 वाजता एका कॉम्प्युटर सेंटर चालवणाऱ्या व्यवसायकाच्या क्लासवर जाऊन त्याला धमकावून एका गुन्ह्यात तुला व तुझ्या भावाला अडकवू गुन्हा तुझ्या क्लासवर घडला आहे. अशी भीती त्याला देऊन नंतर त्याच गुन्ह्यातून त्यांची नावे कमी करण्यासाठी त्याला तडजोडीचा मार्ग दाखवत तीन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. असा गंभीर आरोप चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे. विशेष म्हणजे, तडजोडीनंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी 1,20,000/- रुपये व्यवसायिकाकडून स्वीकारल्याचा आरोप आमदार चव्हाण यांनी केला आहे. तशी चाळीसगाव पोलीस ठाण्यात संबंधित व्यावसायिकाने फिर्याद देखील दिली आहे.

खंडणी घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करून त्याच्यावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आमदार चव्हाण यांनी थेट चाळीसगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. संबंधित तरुण व्यावसायिकाने  आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे तक्रार केली असता, आमदार चव्हाणांनी तात्काळ चाळीसगाव पोलीस ठाणे गाठले. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसमोरच आमदारांनी तक्रारदार तरुण व्यावसायिकाला बोलत केले. व्यावसायिकाने घडलेला प्रकार सांगून पैश्याची मागणी केल्याची सांगीतले. सर्व ऐकून पोलीस अधिकाऱ्यांनीही याबाबत संपूर्ण चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले आहे. मात्र, केवळ आश्वासनावर न थांबता, त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाणे सोडणार नाही, असा पवित्रा आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतला आहे. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना आमदार चव्हाण यांनी प्रश्न विचारला, पोलीस ठाण्याजवळ अनेक अवैध व्यवसाय सुरु आहे. त्यासंदर्भात कारवाई का होत नाही?

आमदार चव्हाण हे सतत लोकांच्या प्रश्नांवर लक्ष देऊन त्यासाठी झटत असतात काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या अनुदान प्रकरणी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांनी आवाज उठवला होता. विहिरीच्या अनुदानासाठी पंचायत समितीचे कर्मचारी 20 ते 30 हजार रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार आमदार चव्हाण यांच्याकडे आल्यानंतर आमदारांनी थेट पंचायत समिती गाठत, दोन दिवसांत दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

✍️पोलीस वार्ता संपादक: निलेश फिरके, भुसावळ, संपर्क: 09960333469
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!