कोंबिंग ऑपरेशन : पाच संशयित ताब्यात !
भुसावळ – शहरातील खडका रोडवरील बडा खानका, मुस्लिम कॉलनी परिसरात ता.१६ रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांनी मिळून सकाळी पाच वाजेला संयुक्त कारवाई करीत सरकारी कामात अडथळा निर्माण करणारे १२ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यातील पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या कब्जातून एक गावठी कट्ट्यासह १६ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
बडोद पोलीस स्टेशन जिल्ह्या आगर मालवा मध्यप्रदेश येथील पोलीस कर्मचारी फसवणुकीच्या गुन्हयातील संशयित आरोपी यांच्या शोध कामी बाजारपेठ पोलीस स्टेशनला आले व मदतीसाठी बाजारपेठ पो.स्टे. चे हर्षल महाजन व प्रशांत सोनार या दोघांना सोबत घेवून भुसावळ शहरातील बडा खानका,मुस्लिम कॉलनी परिसरात ता.१५ रोजी गेले असता.संशयित आरोपी करार अली हुजूर अली यास पोलिसांनी ताब्यात घेतले असता इराणी महिला व पुरुषांनी पोलिसांवर विटा व लाकडी काठ्याचा मारा केला यादरम्यान मध्यप्रदेशातील चार पोलीस कर्मचारी तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशनचा एक कर्मचारी जखमी झाला होता,.
या पाश्वभूमीवर बाजारपेठ पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांनी मिळून ता.१६ रोजी सकाळी पाच वाजेला कोंबिंग ऑपरेशन केले. यादरम्यान १६ मोटरसायकल व एक गावठी कट्टा संशयित मजहर अब्बास जाफर इराणी यांच्या कब्जातुन मिळून आला तसेच दाखल गुन्ह्यातील एकूण पाच संशयितांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली.सदरील संशयितांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कारवाई मुळे जिल्ह्यातील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.
सदरची कारवाई जिल्ह्या पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, प्रशांत परदेशी,रवी नरवाडे, गोपाळ गव्हाळे,उमकांत पाटील,विकास सातदिवे, प्रशांत परदेशी,राहूल वानखेडे निरीक्षक राहुल वाघ,तसेच गुन्हे शोध पथकातील विजय नेरकर,सोपान पाटील,रमण सुरळकर,योगेश माळी,भुषण चौधरी, सचिन चौधरी, कांतीलाल केदारे,अमर अढाळे,महेंद्र पाटील,जीवन कापडे,दिलीप कोल्हे,रवींद्र भावसार,महिला पोलीस कर्मचारी सिमा चौधरी, मिनाक्षी घेटे अशांनी मिळून केली.




































