भुसावळ – शहरात बळोद पोलीस स्टेशन जिल्ह्या अगर मालवा (मध्यप्रदेश) येथील पोलीस दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी करार अली हुजूर अली यांच्या शोध कामी बडी खानका,मुस्लिम कॉलनी परिसरात गेले.संशयितास ताब्यात घेऊन जात असतांना इराणी बांधवांनी गैर कायद्यांची मंडळी जमवून पोलिसांवर हल्ला केल्याची घटना १५ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान घडली.या घटनेमध्ये मध्यप्रदेश बळोद पोलीस स्टेशनचे चार कर्मचारी व बाजारपेठ पोलीस स्टेशनचा एक कर्मचारी जखमी झाला आहे.

या पाश्वभूमीवर बाजारपेठ पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी मिळून कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्ह्यातील संशयित पाच महिलांना ताब्यात घेतले.

असून मुस्लिम कॉलनी परिसरातून १६ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.




































