यावल – वंदनिय हिंदूहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मा. एकनाथरावजी शिंदे (उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार कार्यक्षेत्रातील होऊ आगामी पालिका निवडणुकीत नगरपंचायत,नगरपरिषद, नगरपालिका यावल विभाग साठी पक्ष निरीक्षक सुरेश कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदरील नियुक्ती ही इच्छुक उमेदवार यांची चाचपणी करणे, वार्डातील माहिती गोळा करणे,सामाजिक कार्य विषयी माहिती जाणून घेणे तसेच निवडणूक संदर्भात सर्व माहिती संचयन करून सविस्तर माहिती वरिष्ठांना पोहचविणे तसेच उमेदवारांना निवडणूक संपेपर्यंत मदत करणे.ही सर्व जबाबदार एकनाथ शिंदे गटाचे जळगांव जिल्ह्याध्यक्ष समाधान महाजन सर यांनी नियुक्ती पत्र देऊन सोपविली आहे.


























