Homeसामाजिकपरवानगी न घेता सार्वजनिक महिलांचे शौचालय पाडले; कारवाईची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

परवानगी न घेता सार्वजनिक महिलांचे शौचालय पाडले; कारवाईची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

भुसावळ | प्रतिनिधी कंडारी (ता. भुसावळ) येथील सार्वजनिक महिलांचे शौचालय कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तोडण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत ‘भीम आर्मी’चे तालुका सचिव प्रदीप जनार्दन मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, भुसावळ येथील उपअभियंत्यांकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे. अर्जात नमूद केल्याप्रमाणे, कंडारी ग्रामपंचायतीमार्फत सन २०१८ ते २०१९ दरम्यान महिलांसाठी सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात आली होती. मात्र अलीकडेच कोणतीही शासकीय परवानगी न घेता संबंधित शौचालय पाडण्यात आले आहे.

शौचालय पाडल्यानंतर त्या जागी मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढले असून महिलांना उघड्यावर शौचास बसावे लागत आहे. त्यामुळे साप, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांचा धोका निर्माण झाला असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही अर्जात उपस्थित करण्यात आला आहे.

या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी व तात्काळ महिलांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करून उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळात ‘अमृत’ योजनेचा घोटाळा? नगराध्यक्षांचा संताप उसळला ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

0
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

error: Content is protected !!