Homeआरोग्ययेवला तालुक्यातील अंदरसुल येथील शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मंत्री भुजबळ यांच्या हस्ते..

येवला तालुक्यातील अंदरसुल येथील शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मंत्री भुजबळ यांच्या हस्ते..

अंदरसुल जिल्हा परिषद शाळेतील मुलींनी जपानी भाषेतून अनोख्या पद्धतीने मंत्री भुजबळ यांचे स्वागत केले..

पोलीस वार्ता, नाशिक : मंत्री भुजबळ यांच्या हस्ते आज येवला तालुक्यातील अंदरसूल जिल्हा परिषद मुलींच्या शाळेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी मुलींच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थिनी आणि शिक्षकांसोबत संवाद साधला. अंदरसुल जिल्हा परिषद शाळेतील मुलींनी जपानी भाषेतून अनोख्या पद्धतीने मंत्री भुजबळ यांचे स्वागत केले. तसेच या शाळेतील विद्यार्थिनींनी कोडिंग- डिकोडिंग च्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या ऍप्लिकेशनचे सादरीकरण केले. तसेच इयत्ता चौथीत शिक्षणाऱ्या विद्यार्थिनीने 27 अंकी आकड्यांचे वाचन उपस्थितांसमोर सादर केले.
त्यावेळी मंत्री भुजबळ बोलत असताना म्हणाले तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात अन्य देशांमध्ये करिअरच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध भाषा अवगत कराव्यात. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवावे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, कृषी अधिकारी शुभम बेरड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, येवलाच्या सरपंच लता जानराव, उपसरपंच अमोल सोनवणे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री भुजबळ यावेळी म्हणाले की, सारथी, बार्टी, महाज्योती च्या माध्यमातून राज्य शासन विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन शिक्षण घ्यावे. अंदरसुल जिल्हा परिषदेच्या या शाळेतून विद्यार्थी शालेय जीवनापासूनच यासाठी तयारी करत आहे.
ही बाब अतिशय कौतुकास्पद असून यामध्ये शिक्षकांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. मुलींच्या शिक्षणासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अतिशय महत्वाचे कार्य केले आहे. त्यामुळे आज मुली विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवत आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन मुलींनी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...

error: Content is protected !!