Homeताज्या बातम्याजागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्ववान महिलांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्ववान महिलांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

अमरावती (रमाकांत मोरे ) येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ सामाजिक महिला मंचच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा भव्य सत्कार, सन्मान व गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.

हा कार्यक्रम रविवार दिनांक १० मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कांचन रिसोर्ट, वलगाव रोड, अमरावती येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. शोभाताई देशमुख उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी प्रीतीताई देशमुख (प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद अमरावती), डॉक्टर अनुभूती पाटील (स्त्रीरोग तज्ञ), राजश्री जढाळे (संचालक, महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक), सुरेखा लुंगारे (नगरसेविका), मनोहर सुने राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ , कैलासबापु देशमुख राष्ट्रीय संघटक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, युसुफभाई खान राष्ट्रीय कार्याध्यक्ष अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ,अक्षरा लहाने नगर सेवक अचलपुर तथा विदर्भ कार्याध्यक्ष, महिला मंच – अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ कार्यक्रमा दरम्यान गायन, कथक नृत्य तसेच सुंदर कविता सादरीकरण यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार व गौरव करण्यात आला. यावेळी डॉक्टर माया बोरखडे (आयुर्वेदाचार्य), हर्षा ढोक (क्रीडा क्षेत्र), कांचन उल्हे (उद्योग क्षेत्र), वैशाली बरडे (उद्योग क्षेत्र), कविता घाटोळ (उद्योग क्षेत्र), कांता काळे (आरोग्य सेवा), कविता बोंडे (समुपदेशक), मीनाताई राहिंज अहिल्या नगर (पत्रकारिता), आदित्य मेहता (नृत्यकला), श्रुतिका तायडे (उद्योग क्षेत्र), प्राध्यापक डॉक्टर मंजुषा सागर वडकी यवतमाळ (शिक्षण क्षेत्र), गौरी सतके (गायन), कु. सुयोगा संतापे (लेखन) अलकाताई तल्हार (सहाय्यक कृषी अधिकारी) टोंगलाबाद यांना कृषी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ॲड. पूनम झवर व माधुरी शर्मा ह्यांचा सन्मान, सत्कार करण्यात आला तर दिनेश भटकर (वरिष्ठ यंत्रचालक) वितरण विभाग सर्फापूर यांनी ३० वर्ष सेवा देऊन निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सपत्निक सन्मान करण्यात आला आहे. तसेच राजेंद्र जढाळे (पोलीस उपनिरीक्षक) यांनी पोलीस खात्यामध्ये ३४ वर्ष सेवा देऊन निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला आहे. याच कार्यक्रमांमध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला मंच कडून महिला मंच प्रदेशाध्यक्ष सौ कंचन मूरके यांनी सौ. अक्षरा लहाने कार्याध्यक्ष (विदर्भ महिला मंच),सौ. सुरेखा दामेधर अध्यक्ष (विदर्भ पश्चिम),ॲड. पुनम झंवर विधी सल्लागार महिला मंच, सौ. राजश्री जढाळे अध्यक्ष महानगर अमरावती,सौ. नीलिमा निमकर जिल्हाध्यक्ष अमरावती महिला मंच यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला आहे.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, प्रदेश अध्यक्ष कैलासबापु देशमुख, केंद्रीय सरचिटणीस राजेंद्र भुरे, चिटणीस अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे, केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, केंद्रीय सदस्य बाळासाहेब सोरगीवकर, केंद्रीय विधी सल्लागार ॲड किरण भुते, केंद्रीय सदस्य जयश्री पडगडे, अमरावती जिल्हाध्यक्ष सुधाकर टिपरे व संतोष वाघमारे ,जिल्हा सचिव मनोज मेळे, भातकुली तालुका अध्यक्ष संजय तराळ, अमरावती महानगर अध्यक्ष किशोर बरडे, सौ. हर्षा पाटील कार्याध्यक्ष महिला मंच अमरावती , महाराष्ट्र प्रदेश संघटक दिनेश भटकर, महानगर उपाध्यक्ष संतोष चव्हाण, कार्याध्यक्ष प्रेम कारेगावकर, सचिव अरविंद लुंकड ,डॉ.राहुल अहिर ,सौ. वर्षा गाडगे , राजु शिवणकर, सचिन ढोके यांच्यासह अनेक पत्रकार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहरराव सुने यांनी तर सुत्रसंचालन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला मंच प्रदेशाध्यक्ष कांचन मुरके यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. मंजुषा सागर यांनी केले जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे महिलांच्या कार्याचा गौरव होऊन समाजात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हिच आमची प्रार्थना अन हेच आमचे वागणे या गीताने करण्यात आली. कार्यक्रमात नियोजन व यशस्वितेसाठी सौ. कंचन मुरके मॅडम व राजेंद्र ठाकरे तथा कॅटर्सचे संचालक किशोर बरडे यांनी अथाक परिश्रम घेतले तर स्वादिष्ट स्नेह भोजनाने अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह इतर मंडळींनी आनंद घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आगर टाकळी येथील मनपा शाळा क्र. 47 मध्ये मूलभूत हक्कांची आणि कर्तव्यांची कायदेविषयक कार्यशाळा

नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांची आणि कर्तव्यांची तसेच विविध शासकीय विधी, योजनांची माहिती.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरातील एन बी ठाकूर विधी महाविद्यालयाच्या वतीने...

नाशिक जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत असून कोणतीही टंचाई नाही!

नागरिकांनी कुठल्याही अफवा पसरवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.. पोलीस वार्ता, नाशिक : आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका–इराण...

आकलूद येथे शिवमहापुराण कथेदरम्यान महिलेची प्रकृती बिघडली; उष्माघाताचा प्राथमिक अंदाज

0
यावल तालुक्यातील आकलूद गावात १० मार्चपासून कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मुखातून महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेसाठी मोठा पेंडाल उभारण्यात आला...

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा; येवला येथे 18 मार्च रोजी आयोजन!

विश्वलता आर्ट, कॉमर्स ॲण्‍ड सायन्स कॉलेज भटगाव, येवला, जि.नाशिक या ठिकाणी बुधवार 18 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत रोजगार...

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

0
परभणी (प्रतिनिधी) – जागतिक महिला दिनानिमित्त लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ व माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य...

error: Content is protected !!