पर्यटकांना या पोर्टलवर सर्व प्रकारच्या पर्यटन व्यवसायाची माहिती व फोटो एकाच ठिकाणी उपलब्ध होणार..
पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र राज्यशासनाच्या पर्यटन संचालनालयाने mahabooking.com हे पोर्टल सुरू केले असून पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाची नि:शुल्क नोंदणी या पोर्टलवर करावी, असे आवाहन पर्यटन संचालनालय, नाशिक, उपसंचालक, श्रीमती मधुमती सरदेसाई यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.
या पर्यटन संचालनालयाच्या पोर्टलवर हॉटेल्स, कृषी पर्यटन केंद्र, पर्यटन व्हिला, रिसॉर्ट, कन्वेन्शन सेंटर, वेलनेस सेंटर, इको टुरिझम, स्पेशल टूर्स, गाईड (पर्यटन मार्गदर्शक), टूर व ट्रॅव्हल्स, निवास व न्याहरी, आर्ट ॲण्ड क्राफ्ट शॉप, सोव्हेनियर शॉप, प्रसिद्ध खाद्यपदार्थ विक्री करणारी दुकाने इत्यादी आपल्या व्यवसायाची नोंदणी नि:शुल्क करू शकतात.
तसेच पर्यटकांना या पोर्टलवर सर्व प्रकारच्या पर्यटन व्यवसायाची माहिती व फोटो एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून पर्यटकांना बुकिंगची सुविधा मिळणार आहे. या पोर्टलमुळे पर्यटक व पर्यटन व्यावसायिकांना चांगल्या प्रकारे व्यासपीठ आणि सुविधा उपलब्ध होतील. याबाबत अधिक माहितीसाठी उपसंचालक कार्यालय, पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार, गोल्फ ब्लब मैदान जवळ, नाशिक 422001 या कार्यालयात प्रत्यक्ष अथवा 0253-2995464 या दूरध्वनी क्रमांकवर व 8390731737, 7588950697 या क्रमांकार संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता
( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास
खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...