Homeआरोग्यजिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत विद्यार्थी प्रवेश वाढीसाठी शालेय शिक्षण...

जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत विद्यार्थी प्रवेश वाढीसाठी शालेय शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत..

आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा आढावा शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी घेतला..

पोलीस वार्ता, नाशिक : राज्यातील सर्व शाळा सोमवार दि.16 जून पासून सुरू होत आहे. यावेळी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात येणार आहे. राज्यात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महोदय विविध शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. तसेच नाशिक जिल्ह्यातही सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी हे सर्व शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. याशिवाय, शिक्षण विभागाने गुणवत्ता आणि पटसंख्या वाढीकडे अधिक लक्ष देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा ओघ वाढेल याकडे लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा आढावा शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार किशोर दराडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, शिक्षण उपसंचालक डॉ.बी.बी.चव्हाण आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होते.
सध्या राज्यातील अनेक शाळांमध्ये नवीन उपक्रम राबविले जात आहे. विद्यार्थ्यांचा ओढा जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत वाढावा यासाठी अधिक चांगले आणि गुणवत्तापूर्ण वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत. येत्या सोमवारपासून सर्व शाळा सुरू होत आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि अधिकारी या विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. त्याचे नियोजन जिल्हा परिषदेने तयार केले आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा या शाळांकडे आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम साह्यभूत ठरतील,
विविध शासकीय योजनेव्दारे शाळांच्या पायाभूत भौतिक सुविधांचा विकास – पिण्याचे स्वच्छ पाणी, कम्पाऊंड वॉल, स्वच्छतागृह, वर्ग खोली बांधकाम व दुरुस्ती इ. प्रधानमंत्री पोषण शक्ती कार्यक्रम, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना, 5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा, आधार पडताळणी / अपार आयडी, शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, हेल्थ कार्ड, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम आढावा, पवित्र पोर्टल – शिक्षक भरती टप्पा-2, शिक्षक समायोजन, जिल्हा परिषद – स्मार्ट स्कूल मोहीम, जिल्हा परिषद क्षेत्रात पटसंख्या वाढवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत, शिक्षक / संस्था / अधिकारी यांनी विद्यार्थी हितासाठी राबविलेले नवउपक्रम, आयडॉल शिक्षक बँक, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय शाळा आणि सुपर – 50 कार्यक्रम आदी योजना आणि उपक्रमांचा आढावा घेतला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल यांनी, सुपर ५० तसेच विविध शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या नव्या उपक्रमांची आणि त्याच्या अंमलबजावणीची माहिती दिली.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नितीन बच्छाव यांनी सादरीकरणाद्वारे विविध बाबींची माहिती दिली. यावेळी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यासह उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आदी या बैठकीला उपस्थित होते.
  • उद्योगमंत्री उदय सामंत यांचीही बैठकीला उपस्थिती..

उद्योगविषयक एका बैठकीसाठी मंत्री श्री. सामंत हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. ती बैठक संपल्यानंतर त्यांनी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे घेत असलेल्या बैठकीच्या ठिकाणी आले आणि या बैठकीत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी नाशिक जिल्ह्यात शिक्षण विभाग राबवित असलेल्या विविध उपक्रमाबद्दल कौतुकोद्गार काढले.
  • शिंदे गावचे सरपंच बाजीराव जाधव यांचा सत्कार..

जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय शिंदे गावाने घेतला आहे. याबद्दल शालेय शिक्षणमंत्री भुसे आणि उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते शिंदे गावचे सरपंच बाजीराव जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!