चोरीच्या घटनेचा अंबड पोलीस ठाण्यात दि.3 जून 2025 रोजी गुरनं- 369/2025 भा.न्या.सं.कलम 305(ए) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता..
पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरातील चोरी, घरफोड्या तसेच गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगारांचा तपास करून कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक साहेब यांनी शहर पोलीस गुन्हेशाखा विभागाला दिले आहेत.
याच अनुषंगाने अंबड पोलीस ठाण्यात एक चोरीच्या घटनेचा गुन्हा दाखल झाला होता. हेडगेवार नगर येथे दि.2 जून 2025 रोजी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास एकाच्या घराचा मागील दरवाजा उघडा पाहून एक अनोळखी इसम यांने घरात प्रवेश करून लोखंडी कपाट उघडुन त्यातील लॉकर मधील सोन्या-चांदीचे दागिने चोरी करून पळून गेला याबाबत फिर्यादी यांनी अंबड पोलीस ठाण्यात दि.3 जून 2025 रोजी गुरनं- 369/2025 भा.न्या.सं.कलम 305(ए) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
या चोरीचा तपास गुन्हेशाखा युनिट-2 कडून करत असताना पोह. नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश महाजन, मनोज परदेशी यांना गुप्त माहिती माहीती मिळाली की, एक जण चोरीचे सोने हे हेडगेवार नगर येथील अमरधाम जवळ विक्रीच्या उद्देशाने घेऊन येणार आहे. ही माहीती त्वरित गुन्हेशाखा युनिट-2 चे सपोनि. हेमंत तोडकर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनात पोह. नंदकुमार नांदुर्डीकर, सुनिल आहेर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, वाल्मीक चव्हाण, मनोज परदेशी, पोअं. प्रविण वानखेडे, संजय पोटींदे यांचे पथक तयार करून मिळालेल्या माहितीच्या आधारे हेडगेवार नगर, उंटवाडी अमरधाम या ठिकाणी जावुन सापळा लावला व शिताफिने आरोपीला तिथून ताब्यात घेण्यात आले. त्याचे नांव व पत्ता विचारले असता त्याने स्वप्नील संजय पवार (वय-19) रा. पाटीलनगर, नविन सिडको, नाशिक असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळून सोने व चांदीचे दागिने असा एकुण 38,350/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली, गुरनं- 369/2025 हा गुन्हा उघडकीस आला असुन पुढील कारवाई आरोपीस अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 कडून करण्यात आली. पथकात सपोनि. डॉ.समाधान हिरे, श्रेणी. पोउनि. मुक्तारखान पठाण, सपोउनि. बानु शेळके, शंकर काळे, सुहास क्षीरसागर, पोह संजय सानप यांचा देखील समावेश होता.
✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता
( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास
खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता
( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास
खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...