Homeआरोग्यमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024; नागरिकांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, जिल्हा निवडणूक...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024; नागरिकांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा..

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी होणार आहे.

पोलीस वार्ता, नाशिक: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदान करणे हे नागरिकांचा मुलभूत अधिकार व कर्तव्य असून या प्रक्रियेत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, तहसीलदार (निवडणूक) श्याम वाडकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.शर्मा म्हणाले की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी होणार आहे. यादृष्टीने जिल्ह्यात सुरू असलेल्या आवश्यक पूर्वतयारीच्या माध्यमातून केलेल्या विशिष्ठ बाबींची कार्यपूर्ती खालील प्रमाणे विशद केली.
मतदार ओळखपत्र (इपीक) व्यतिरिक्त दिलेले 12 पैकी कोणताही एक पुरावा मतदानाकरिता आवश्यक..
1) मतदान यंत्र दुसऱ्या सरमिसळीनंतर केंद्रनिहाय एकत्रित करणे..
7 नोव्हेंबर 2024 रोजी EMS प्रणालीत मा.निवडणूक निरीक्षक व उमेदवार यांच्या समक्ष मतदान यंत्र दुसरी सरमिसळ प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यानंतर उमेदवार/ प्रतिनिधी यांच्या समक्ष मतदान केंद्र निहाय मतदान यंत्राच्या जोड्या जुळवून मतदान यंत्रे तयार करण्याची प्रक्रिया विधानसभा मतदारसंघ स्तरावर केली जाणार आहे.
2) गृह मतदान..
8 नोव्हेंबर 2024 पासून वय वर्षे 85 हून अधिक व दिव्यांग मतदारांपैकी संमती दिलेल्या  मतदारांचे गृह मतदान सुरू करण्यात आले आहे. यामध्ये 2 हजार 449 मतदारांच्या घरी जाऊन टपाली  मतपत्रिकेद्वारे त्यांचे मतदान करून घेतले जाणार आहे.
3) टपाली मतपत्रिका पहिले आदान-प्रदान..
9 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हास्तरावर व 10 नोव्हेंबर 2024 रोजी विभाग व राज्यस्तरावर टपाली मतपत्रिकेचे आदान प्रदान केले जाणार आहे.
4) मतदान अधिकारी/ कर्मचारी दुसरे प्रशिक्षण..
11 व 12 नाव्हेंबर 2024 रोजी मतदान अधिकारी / कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण घेतले जाणार आहे. त्याठिकाणी मतदान अधिकारी / कर्मचारी यांच्या टपाली मतदानासाठी सुविधा कक्ष कार्यान्वित केले जाणार आहेत.
5) मतदार माहिती चिठ्ठी (VIS) वाटप..
बी.एल.ओ. मार्फत 10 नोव्हेंबर 2024 पासून सर्व मतदारांना घरोघरी जाऊन मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप केले जाणार आहे. यामधून मतदारांना मतदान केंद्र, मतदार यादीतील अनुक्रमांक याबाबत माहिती मिळणार आहे.
6) मतदान यंत्रे तयार करणे..
12 ते 14 नोव्हेंबर 2024 दरम्यान भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) च्या इंजिनिअर मार्फत मतदान यंत्र तयार करणे (कमिशनिंग) प्रक्रिया ही उमेदवार/ प्रतिनिधी यांच्या समक्ष पार पडणार आहे.
7) टपाली मतपत्रिका दुसरे आदान-प्रदान..
15 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हा स्तरावर व 16 नाव्हेंबर 2024 रोजी विभागीय व राज्यस्तरावर टपाली मतपत्रिकांचे दुसरे आदान प्रदान केले जाणार आहे.
8) मतदार यादी वर्किंग कॉपी तयार करणे..
14 नोव्हेंबर 2024 पासून मतदार यादीच्या 4 वर्किंग कॉपी तयार केली जाणार आहे. ज्यामध्ये टपाली व ई.डी.सी. द्वारे मतदान करणाऱ्या मतदारांची नोंद केली जाणार आहे.
9) मतदान साहित्य तयारी..
मतदान केंद्रनिहाय साहित्य पिशव्या 15  ते 17 नोव्हेंबर 2024 दरम्यान तयार केल्या जाणार आहेत.
10) मतदान अधिकारी/कर्मचारी  यांचे तिसरे प्रशिक्षण..
19 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान अधिकारी/ कर्मचारी यांचे तिसरे प्रशिक्षण पार पडणार आहे.
11) मतदान साहित्य वाटप..
19 नोव्हेबर 2024 रोजी मतदान साहित्य सर्व पथकांना ताब्यात देऊन मतदान केंद्राकरिता रवाना केले जाणार आहे.
12) मतदान साहित्य स्वीकृती..
20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानानंतर मतदान पथकांकडून मतदान यंत्रे व इतर मतदान साहित्य जमा करून घेतले जाणार आहे.
13) सैनिक मतदार टपाली मतपत्रिका स्वीकृती..
ETPBMS प्रणाली व्दारे एकूण 8 हजार 796 सैनिक मतदारांना मतपत्रिका पाठविण्यात आलेल्या आहेत. संबधित सैनिक मतदारांकडून पोस्टाव्दारे मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे मतमोजणी  23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत जमा करून घेतल्या जाणार आहेत.
14) मतमोजणी..
23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजेपासून  संबधित विधानसभा मतदारसंघ स्तरावर मतमोजणी प्रकिया सुरू केली जाणार आहे.
15) स्वीप कार्यक्रम..
स्वीप कार्यक्रम अंतर्गत नाशिक जिल्हयात मतदारांची टक्केवारी वाढविण्याकरिता 8 नाव्हेंबर 2024 पासून दैनंदिन विविध उपक्रम राबविले जात आहेत.
16) मतदानाकरिता आवश्यक पुरावे..
मतदार ओळखपत्र (इपीक) व्यतिरिक्त खालील 12 पैकी कोणताही एक पुरावा मतदानाकरिता ओळख पटविण्याकामी मतदारांनी सोबत बाळगणे आवश्यक आहे.
1) आधार कार्ड,
2) महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड,
3) बँकेचे / पोस्टाचे फोटो असलेले पासबुक,
4) श्रम मंत्रालयाकडून जारी करणेत आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,
5) वाहन चालविण्याचा परवाना,
6) पॅन कार्ड,
7) एनपीआर अंतर्गत रजिस्ट्रार जनरल यांचेकडून जारी करण्यात आलेले स्मार्ट कार्ड,
8) भारतीय पासपोर्ट,
9) फोटो असलेले पेन्शन कागदपत्रे,
10) केंद्र/राज्य सरकार तसेच केंद्र/राज्य सरकारचे उपक्रम सार्वजनिक कंपनी इ.कडून त्यांचे अधिनस्त अधिकारी/कर्मचारी यांचेसाठी निर्गमित करणेत आलेले फोटो असलेले ओळखपत्र, 
11) संसद सदस्य, विधानसभा / विधान परिषद सदस्य यांना जारी करण्यात आलेले शासकीय ओळखपत्र,
12) सामाजिक न्याय विभाग भारत सरकार यांचेकडून निर्गमित युनिक डिसॲबिलिटी (युडीआयडी) कार्ड,
मोबाईल प्रतिबंध; मतदान केंद्राच्या आतमध्ये मतदारांना मोबाईल सोबत बाळगता येणार नाही.
17) मोबाईल वापरास प्रतिबंध..
मतदान केंद्राच्या आतमध्ये मतदारांना मोबाईल सोबत बाळगता येणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत मोबाईल केंद्राबाहेर ठेवण्याची व्यवस्था मा.निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार केली जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळात ‘अमृत’ योजनेचा घोटाळा? नगराध्यक्षांचा संताप उसळला ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

0
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

भुसावळात ‘अमृत’ योजनेचा घोटाळा? नगराध्यक्षांचा संताप उसळला ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

0
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...
error: Content is protected !!