Homeउद्योगवणी बसस्थानकाला अखेर नवीन बसेस मिळाल्या; मानवी हक्क सुरक्षा परिषदेने दिला होता...

वणी बसस्थानकाला अखेर नवीन बसेस मिळाल्या; मानवी हक्क सुरक्षा परिषदेने दिला होता आंदोलनाचा इशारा!

मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने 15 दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, परिवहन मंत्र्यांकडे वणीसाठी नवीन बसेसची मागणी करण्यात आली होती..

पोलीस वार्ता, यवतमाळ : वणी आगाराला नवीन लालपरी बसेस मिळवण्याकरिता महाराष्ट्र-प्रदेश मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने 15 दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, परिवहन मंत्र्यांकडे मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल न घेतल्यास दि. 5 मे 2025 पासुन वणी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलनाचा इशारा परिषदेच्या वतीने देण्यात आला होता, मात्र आता राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी मानवी हक्क सुरक्षा परिषदेची मागणी लक्षात घेऊन वणी आगाराला नवीन 5 बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. या बसेस वणी आगारात आणण्याकरिता रविवारी चालक आणि वाहक हे दापोली, पुणे येथे रवाना होणार होते. अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे नेते राजु धावंजेवार यांना एका पत्रांद्वारे दिली आहे. त्यामुळे सोमवारी सुरू होणारे परिषदेचे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती परिषदेने मिडीयाला दिली आहे. आणि राज्य परिवहन मंडळ एसटी विभागाचे आभार देखील मानले आहे.
वणी हे तालुक्याचे ठिकाण असून वणीतील राज्य परिवहन मंडळ बसेसचे उत्पन्न हे संपुर्ण यवत‌माळ जिल्ह्यात राज्य परिवहन मंडळात प्रथम क्रमांकाचे आहे. तरी वणी आगारात फक्त 32 बसेस कार्यरत होत्या सर्व प्रवाशांचा भार यांवरच सुरु होता, 33 बसेस स्क्रैप ह्या झाल्या होत्या त्यामुळे लालपरी ही धक्कापरी असल्याचा अनुभव प्रवाशांना येत होता, ह्या बसेसची डागडुगी करून टिनचे पत्रे लावले तरी जागोजागी पावसाळ्यात बस गळती होऊन प्रवाश्यांना याचा त्रास सहन करावा लागत होता.
याच अनुषंगाने अखेर मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे नेते राजु धावंजेवार यांनी याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडे वणी आगारासाठी निवेदनाद्वारे नवीन बसेसची मागणी केली होती. याच प्रकारे येणाऱ्या काळात देखील मानवी हक्क सुरक्षा परिषद वणी तालुक्यात सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांवर, सुविधांवर सरकारचा पाठपुरावा करत राहील.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...

error: Content is protected !!