30 जून 2025 पर्यंत आपल्या वाहनाची HSRP नंबर प्लेट बसवून घावी. असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांनी केले आहे..
पोलीस वार्ता, नाशिक : रस्त्यांवर धावणाऱ्या प्रत्येक वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट म्हणजे HSRP बसविणे आवश्यक आहे. तसेच वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे यासर्व घटना थांबण्यासाठी परिवहन विभागाच्या 23 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध परिपत्रकानुसार जिल्ह्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित म्हणजे तयार झालेल्या सर्व वाहनांच्या मालकांनी 30 जून 2025 पर्यंत आपल्या वाहनाची HSRP नंबर प्लेट बसवून घावी. असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांनी केले आहे.
वाहनांना एच.एस.आर.पी / HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी नाशिक जिल्ह्यासाठी M/s. FTA HSRO solutions pvt.Ltd ही एजन्सी निश्चित करण्यात आली आहे. वाहनधारकांनी http://maharashtrahsrp.com अथवा http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळवार अर्ज करून आपल्या वाहनास HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी.

शासन निर्णयानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या ज्या वाहनांना HSRP नंबर प्लेट 30 जून 2025 पर्यंत न बसविल्यास अशा सर्व वाहनांचे मालकी हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये (RC) पत्ता बदल करणे, वित्त बोजा चढविणे/ उतरविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, ना-हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे अश्या वाहन विषयक कुठलेही कामे करता येणार नाही. तथापि ज्या वाहन मालकांनी HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी नियोजित वेळ व दिनांक घेतला असल्यास त्याची पावती उपरोक्त कायदपत्रांसोबत जोडल्यास त्यांच्या वाहनांचे पुढील कामकाज करण्यात येणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात करण्यात आले आहे.







































