Homeक्राईमभोंगवलीच्या वृद्धाचा जांभळी येथे हॉटेलमध्ये खून ; कामगारावर संशय

भोंगवलीच्या वृद्धाचा जांभळी येथे हॉटेलमध्ये खून ; कामगारावर संशय

भोर :- ( संतोष मोहिते ) जांभळी गावाच्या हद्दीत नसरापूर–वेल्हा रोडलगत असलेल्या हॉटेलमध्ये एका वृद्धाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल सखाराम रसाळ (वय 48, रा. जांभळी, ता. भोर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीच्या “7/12 शेतकरी व्हेज-नॉनव्हेज हॉटेल”मध्ये त्यांचे सासरे किसन बापू सुर्वे (वय 75) हे रात्री झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर बोथट हत्याराने वार करून त्यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.मयत किसन सुर्वे हे मूळ भोंगवली (ता. भोर) येथील रहिवासी होते.

ही घटना दि. 24 मार्च 2026 रोजी रात्री 11.00 ते दि. 25 मार्च 2026 रोजी सकाळी 9.00 वाजण्याच्या दरम्यान घडली असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी सागर थापा (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) या हॉटेलमधील कामगारावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. मोबाईल देण्याच्या कारणावरून राग मनात धरून त्याने ही घटना घडवून आणली असावी, असा फिर्यादीचा आरोप आहे.

या घटनेप्रकरणी राजगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 126/2026, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद दि. 25 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5.55 वाजता करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड तपास करत असून पोलीस नाईक इंगळे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावदा दुध संस्थेत विदेशी दारू साठा; पोलिसांची छापा कारवाई

0
रावेर (साजित शेख) तालुक्यातील सावदा शहरात सहकारी दुध उत्पादक संस्थेमध्ये विदेशी दारूची बेकायदेशीर साठवण आणि विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सावदा...

आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.

0
बरेली - रमाकांत मोरे ।  निरोगी शरीरासाठी आरोग्यविषयक माहिती देताना डॉ. विधिना पाटील यांनी स्पष्ट केले की, मोठ्या प्रमाणात धूम्रपान, पान, गुटखा आणि मद्यपान केल्याने...

भीम जयंती 135 महोत्सव निमित्त देवळालीत जयंती समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन!

जयंती उत्सव कार्यक्रम व्यवस्थित संपन्न होण्याच्या दृष्टीने नियोजन व बैठकांच्या व्यवस्थापनासाठीच देवळाली कॅम्प येथे समितीचे कार्यालय.. पोलीस वार्ता, नाशिक : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135...

प्रेमविवाहाचा राग मनात धरून तरुणाला खांबाला बांधून, निर्वस्त्र करून मारहाण!

तरुणाने प्रेमविवाह केल्याच्या रागातून नातेवाईकांनी हा अमानुष प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात समोर.. पोलीस वार्ता, भुसावळ : तालुक्यातील खडका येथे प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून एका तरुणाला खांबाला...

भुसावळ रेल्वे स्थानकावर गुटखा कारवाई; 2.53 लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाच्या संयुक्त कारवाईत 2 लाख 53 हजार 506 रुपयांचा गुटखा जप्त.. पोलीस वार्ता, भुसावळ : महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची रेल्वेमार्गे...

error: Content is protected !!