भोर प्रतिनिधी :- राम पाचकाळे । दि. १४ मे २०२६ रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भोर तालुक्यातील न्हावी १५ येथे आयोजित करण्यात आलेले १०० वे विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला वर्ग, युवक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश तनपुरे यांनी प्रभावीपणे केले. हिंदू समाज एकत्र येणे, कुटुंब प्रबोधन तसेच हिंदू संस्कृतीचे जतन व संवर्धन याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभर विराट हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून न्हावी १५ येथे हा भव्य कार्यक्रम पार पडला.
या संमेलनाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. प्रवीण दबडघाव (प्रांत कार्यवाह, पश्चिम महाराष्ट्र), मातृशक्ती प्रबोधनकर्त्या किशोरीताई पवार (लेखिका व कवयित्री) उपस्थित होत्या. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून ह.भ.प. राहुल महाराज पारठे (महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्कार प्राप्त, झी टॉकीज ‘प्रेम युवा’ कीर्तनकार) यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.
यावेळी भालचंद्र जगताप, बाळासाहेब गरुड, रोहन बाठे, संतोष मोहिते, सोमनाथ सोमानी, आप्पा चव्हाण, संतोष धावले, विश्वास ननावरे, डॉ. चोबे, ॲड. मंगेश आंबुले, अशोक चव्हाण, अंकुश हिंगे, मेघराज सोनवणे, राजेंद्र निगडे, भरत सोनवणे, विजय गरुड, विकास चव्हाण, अर्जुन बोबडे, रामदास गाडे, पांडुरंग निगडे, निलेश सोनवणे यांच्यासह पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, सदस्य, महिला वर्ग, सोसायटी सदस्य, चेअरमन आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात न्हावी १५, भोंगवली, हिंगे वाठार परिसरातील इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, महिला वर्ग आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या शेवटी पसायदानाने वातावरण भक्तिमय झाले आणि मोठ्या उत्साहात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




































